अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर नगरपरिषद करणार दंडात्मक कारवाई
सदर पथक ओला व सुका कचरा वर्गीकरण करून घंटागाडी मध्ये टाकण्यात येतो की नाही याची तपासणी करणार आहे. तसेच सकाळी ६. ३० ते १०. व सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत रस्त्यावर कचरा टाकणे, अनावश्यक पाणी सोडणे याबाबत त्वरित दंडात्मक कारवाई करणे बाबत सूचना या पथकाला दिली आहे.
तरी नागरिकांना आपल्यावरील कारवाई टाळण्यासाठी रस्त्यावर कचरा टाकू नये, आपल्या नळाला तोटी नसल्यास त्वरित बसवून ग्यावी . व ओला व सुका कचरा वर्गीकरण करूनच कचरा घंटागाडीतच टाकावा व नागपरिषदेला सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी यांनी शहरातील नागरिकांना केले आहे.
