Breaking News

अस्वच्छता करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई

रत्नागिरी, दि. 04, जानेवारी - स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत स्वच्छ आणि सुंदर शहरे करण्यासाठी प्रशासनासोबत लोकसहभागही महत्वाचा ठरत आहे. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश शासनाने नगरपालिकांना दिले आहेत. त्यामुळे आपल्या गलिच्छ कृतीद्वारे सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता बिघडविणे नाग रिकांना आता महागात पडणार आहे.


स्वच्छ आणि सुंदर शहर करण्याचा उद्देश डोळ्यांसमोर राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची शहरामध्ये धुमधडाक्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात ज्या लोकांकडे शौचालये नाहीत, त्यांना अनुदानाच्या माध्यमातून शौचालये बांधण्यासाठी उद्युक्त करण्यात आले. त्यातून शहरे हागणदारीमुक्त झाली. आता दुसर्या टप्प्यामध्ये शहरामध्ये गोळा आणि निर्माण होणार्या कचर्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला आहे.