कोकण प्रदेश भूमी अभिलेखच्या दापोलीत क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धा
रत्नागिरी, दि. 04, जानेवारी - कोकण प्रदेश भूमि अभिलेखच्या विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा येत्या 5 आणि 6 जानेवारीला दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृ षी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर होणार आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन 5 जानेवारीला सकाळी साडेनऊ वाजता विद्यापीठाचे अधिष्ठाता (कृषी) शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे, राष्ट्रीय कबड्डी पुरस्कार विजेते शैलेश सावंत यांच्या हस्ते होणार आहे. कोकण प्रदेश भूमि अभिलेख उपसंचालक आप्पासाहेब गिरमकर अध्यक्षस्थानी आहेत. तसेच ठाणे, रायगड, मुंबई उपनगर, पालघर भूमी अभिलेखचे अधीक्षक उपस्थित राहणार आहेत.
कोकण प्रदेश मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भूमी अभिलेखचे अधिकारी व कर्मचारी स्पर्धेत भाग घेणार आहेत. यामध्ये क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबॉल, खो-खो, धावणे, चालणे, लांबउडी, गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक, टेबल टेनिस, बॅडमिंटन, पोहणे, कॅरम, बुद्धिबळ, रस्सीखेच आदी स्पर्धा होतील. 5 जानेवारीला सायंकाळी साडेसहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत सांस्कृतिक स्पर्धा होतील. दुसर्या दिवशी अंतिम सामने होणार आहेत.