केएफडी जनजागृतीसाठी आंब्रडमध्ये ग्रामसभा
सिंधुदुर्गनगरी, दि. 12, जानेवारी - कुडाळ तालुक्यात आंब्रड टेंबवाडी येथे 4 जानेवारीला मृतावस्थेत सापडलेल्या चारपैकी तीन माकडांचा विच्छेदन अहवाल केएफडी पॉझीटीव्ह आला आहे. त्यामुळे गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाल आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
या बाबत जनजागृती करण्याबाबत आज गावात ग्राम सभा झाली. आंब्रड गावात अगर परिसरात कोणाला ताप आल्यास संबंधित कुटुंब अगर सामाजिक कार्यकर्त्यांनी तत्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा अस आवाहन यावेळी करण्यात आल. जिल्हा आणि तालुका आरोग्य अधिकार्यानी लगेचच गावात जाऊन सर्व संबंधित यंत्रणा आणि लोकप्रति निधींशी चर्चा केली. आरोग्य विभागान तत्काळ फेर सर्व्हे आणि केएफडी प्रतिबंध तेल वाटप कार्यक्रम हाती घेतला आहे तर पशुसंवर्धन विभागाने गोचीड निर्मूलनाचे काम हाती घेतले आहे.
4 जानेवारी रोजी टेंबवाडी येथील गोपाळ परब यांना त्यांच्या घरामागील डोंगरात चार मृत माकडे दिसली होती. आरोग्य, वन आणि पशु संवर्धन विभागाने त्याची गंभीर दखल घेत गावात दक्षता घेतली. चारही मृत माकडांचे विच्छेदन करून दोन वेगवेगळ्या तपासण्यांसाठी त्यांचेह व्हिसेरा पुणे येथे पाठवण्यात आले होते.