Breaking News

पारनेर शहरात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद.


पारनेर/प्रतिनिधी / - भिमा कोरेगांव प्रकरणाची पुरोगामी समविचारी संघटनांच्या वतीने निषेध सभेचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात आयोजन करुन जाहीर निषेध नोंदविला. शहरात ग्रामस्थानी आपापली दुकाने बंद ठेवल्याने शहरात बंदला 100 टक्के उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी कोरेगांव भिमा येथे झालेल्या अमानुष हल्ल्यातील समाजकंटकावर कारवाई करण्याबाबतचे निवेदन पारनेरच्या तहसिलदार भारती सागरे यांजकडे देण्यात आले. बंदच्या काळात शहरात पोलीसांनी बंदोबस्त चोख ठेवला होता. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. पुरोगामी संघटनांच्या वतीने आंबेडकर चौकात निषेध सभा झाली. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. या निषेध सभेत संजय वाघमारे,बबन वाबळे,सुभाष औटी,हसन शेख,शैलेन्द्र औटी,शंकर नगरे,सचिन नगरे,अमित जाधव आदिंनी तीव्र भावना व्यक्त केल्या.

निवेदनात म्हटले आहे की. भिमा कोरेगांव येथे क्रांती स्तंभास अभिवादन करण्यासाठी आलेल्या भिमसैनिक आणी बहुजन समाजाच्या अनुयायांवर भ्याड हल्ला करुन बहुजन समाजामध्ये दंगल घडवुन फुट पाडण्याचा प्रयत्न मनुवादी मिलिंद एकबोटे ,मनोहर भिडे व आनंद दवे व बजरंग दलाने केला आहे.परंतु हा कुटील डाव बहुजन समाजाने हाणुन पाडला 

अश्या प्रकारे नेहमिच बहुजन समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करण्यात येतो.तसेच मनोहर भिडे,मिलिंद एकबोटे,आंनद दवे याच्यावर दंगल घडवल्याचा गुन्हा दाखल करुन त्यांना ताबडतोब अटक करण्यात यावी. सदर भ्याड हल्याचा पारनेर तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे. तसेच सर्व बहुजन समाजाला शांतता व संयम राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

या निषेध सभेस संजय वाघमारे, बबन वाबळे, हसन राजे, सुभाष औटी,शैलेन्द्र औटी, विलास मते, गोकुळ शिंदे.राजेन्द्र करंदीकर, बाळासाहेब शेटे, सुभाष नगरे,बाळासाहेब सोनवणे, युवराज पठारे,शंकर नगरे, सचिन नगरे, राजु उबाळे, बाळासाहेब नगरे, संजय मते, डॉ.मुदस्सर सय्यद, संतिष पिंपरकर, देवदत्त साळवे, अँड.बाळासाहेब सोनवणे, बाळासाहेब कांबळे, शिरीष साळवे, सागर सोनवणे, प्रल्हाद शिंदे. रोकडे भाउसाहेब, तुषार भाटीया, सुधीर सोनवणे, दशरथ सोनवणे, जय जगताप, आनंद जाधव, गिरीष उमाप, सचिन उमाप, दादाभाउ सातपुते, मच्छिन्द्र नगरे, नितीन नगरे, संपत पवार, अविऩाश देशमुख, राजु उघडे, सुऩिल शिंदे, वर्षा नगरे, सुनंदा गायकवाड, सुनिता उमाप, सुनिता सोनवणे, छाया गायकवाड, वंदना सोनवणे, शशिकला सोनवणे, प्रमिला मोरे, सुनिता शिंदे,तसेच तालुक्यातील असंख्य भिमसैनिक उपस्थित होते.