Breaking News

मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले शनिदर्शन


मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शनी शिंगणापूर ये‍थे शनिदर्शन घेतले. यावेळी आमदार शिवाजीराव कर्डीले, आमदार विनायक मेटे, आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, शनैश्‍वर देवस्‍थानच्या अध्‍यक्षा अनिता शेटे आदी उपस्थित होते.
अहमदनगर जिल्ह्यात हाळगाव येथील कृषी महाविद्यालयाचा भूमीपूजन समारंभ आणि त्यानंतर कर्जत येथील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा समारोप आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनि शिंगणापूर येथे येऊन श्री शनैश्वराचे दर्शन घेतले.