Breaking News

पालघर जिल्ह्यात बालमृत्यूच्या संख्येत लक्षणीय घट- डॉ.दीपक सावंत


पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाड्यात नवजात शिशु अतिदक्षता कक्षांची संख्या वाढविण्यात येणार आहे. बालमृत्यू रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांमुळे पालघर जिल्ह्यातील बालमृत्यूंच्या संख्येत गेल्या वर्षाच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे दिली.

पालघर जिल्ह्यातील बालमृत्यू रोखण्यासाठी जून महिन्यापासून या भागाचा दर पंधरा दिवसांनी दौरा करुन वाडे, पाड्यांना, आरोग्य उपकेंद्रांना अचानक भेटी दिल्या आहेत. २०१७ वर्षाच्या शेवटच्या दिवशी अचानक जव्हार, मोखाड्यातील उपकेंद्रांना भेटी दिल्या आहेत. या ठिकाणच्या रुग्णालयांमध्ये नवजात शिशु अतिदक्षता कक्षांची संख्या वाढविण्यात येणार आहे. खासगी कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीची (सीएसआर) यासाठी सहाय्य घेतले जाणार आहे,असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.