उडीद आणि मूग खरेदीसाठी 12 जानेवारीपर्यंत मुदतवाढ
उडीद आणि मुगाच्या आधारभूत किमतीनुसार खरेदी दि.12 जानेवारीपर्यंत करता येइल.यासंदर्भात केंद्रीय कृषी विभागाकडून मंजुरीचे पत्र आज प्राप्त झाले,अशी माहिती पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे.राज्य शासनाने उदीड आणि मूग खरेदीसाठी मुदतवाढ मिळण्याबाबत 21 डिसेंम्बर रोजी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. त्याला सकारात्मक प्रतिसाद केंद्र शासनाने उडीदाच्या वाढिव खरेदीसाठी 52 हजार मेट्रिक टनापर्यंत मंजुरी दिली असून उडीद आणि मूग आधारभूत किमतीत खरेदीसाठी 12 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यासंदर्भात केंद्रीय कृषी मंत्रालयाने नाफेड, एसएफएसी आणि एफसीआयच्या अधिकाऱ्यांना पत्राद्वारे आज कळविले आहे. त्याची प्रत पणन विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार यांनाही देण्यात आली आहे.