Breaking News

हजरत अशरफशहा वली (रहे.) दर्गाचा संदल उरुस उत्साहात


अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्व धर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या ख्रिस्तगल्ली येथील हजरत सय्यद अशरफशहा वली (रहे.) दर्गाचा संदल ऊरुस उत्साहात साजरा करण्यात आला. दर्गाच्या संदल उरुस निमित्त शहरातून पारंपारिक वाद्यांसह भव्य शोभायात्रा काढण्यात आली. तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
संदल उरुस निमित्त आयोजित भंडार्‍याचे शुभारंभ उद्योजक करिमशेठ हुंडेकरी, नगरसेवक मुदस्सर शेख व मुजाहिद (भा) कुरेशी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी दर्गाच्या मजारवर उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते चादर अर्पण करण्यात आली. यावेळी मुजावर अन्सार सय्यद (पेटीवाले), बबन चंगेडिया, अरबाज कुरेशी, सोनू शेख, बाळू चंगेडिया, रफिक बागवान, आलिम वस्ताद, पप्पू कुरेशी, बबलू रंगरेज, तुपेल कुरेशी, ताहिर शेख, आकिल शेख, किरण शिंगवी आदि उपस्थित होते. संदल उरुस निमित्त दर्गास आकर्षक फुलांची व विद्युत रोषणाईची सजावट करण्यात आली असून, दर्शनासाठी भाविक गर्दी करीत आहे.