Breaking News

विमान प्रवाशांची संख्या १० कोटींवर.


नवी दिल्ली : देशाअंतर्गत विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या २२ टक्के वाढली असून २०१६ ते २०१७ या वर्षात देशातील विमान प्रवाशांची एकूण संख्या १० कोटी असल्याची माहिती गुरुवारी केंद्रीय उड्डयन मंत्री अशोक गजपथी राजू यांनी लोकसभेत दिली. खा. चंद्रकांत खैरे यांच्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना ते म्हणाले की, गत वर्षात देशाअंतर्गत एअरलाइन्सद्वारे हवाई प्रवास करणारांची संख्या १०.३७ कोटी होती. ही संख्या २०१५ ते २०१६ या वर्षाच्या तुलनेत २१.८ टक्क्यांनी वाढली आहे. यामध्ये एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या १३.२ टक्के आहे.