शरद पवार यांचे राज्यसभेत निवेदन!
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भीमा-कोरेगाव हिंसाचाराप्रकरणी गुरूवारी राज्यसेभत निवेदन दिले. मागील 50 वर्षात भीमा-कोरेगावमध्ये कोणतीही छोटी-मोठी अनुचित घटना घडली नव्हती. रस्त्यात जी गावे आहेत, ती गावे या विजयस्तंभाकडे येणार्यांना प्रत्येक प्रकारची मदत करतात. जवळच्या वढू या गावात, दोनशे वर्षापूर्वी शिवाजीराजेंचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या मोघलांनी केली होती.
त्यांची समाधी वढूमध्ये आहे. संभाजींच्या समाधीचे रक्षण करण्यासाठी ज्यांनी योगदान दिले, ते द लित समाजाचे होते. त्यांचीही समाधी तिथेच आहे. दुर्दैवाने एक महिन्यापूर्वी काही समाजकंटकांनी तिथे विध्वसंक काम केले. त्या समाजकंटकांचे मी नाव घेणार नाही. कारण महाराष्ट्र सरकारने त्यांची नावे आरोपी म्हणून घेतली आहे. त्यांची नावे काही वेळापूर्वी सभागृहात रजनीताईंनी घेतली होती, (संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे) त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत आणि न्यायालयीन चौकशीही होणार आहे. त्यामुळे त्याबाबत अधिक बोलणे उचित ठरणार नाही. मी इथे एक सांगू इच्छितो, तिथे दलित व्यक्त ीची जी समाधी आहे, त्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न काहींनी केला. त्याची प्रतिक्रिया नंतर उमटली, असे शरद पवार म्हणाले.