Breaking News

पाकच्या 12 सैनिकांचा खात्मा

जम्मू-काश्मीर : पाकिस्तानने काल केलेल्या गोळीबारात भारताच्या सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला, तर काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात मेजर प्रफुल्ल मोहरकरही शहीद झाले होते. याचाच बदला गुरुवारी भारतीय लष्कराने घेत पाकच्या 12 सैनिकांचा खात्मा केला.


बीएसएफ जवान राधापद हाजरा यांना काल त्यांच्या वाढदिवशीच वीरमरण आले होते. याचाच बदला बीएसएफच्या जवानांनी घेतला. यावेळी बीएसएफच्या कारवाईत 12 पाकिस्तानी सैनिकांना ठार झाले आहेत. बीएसएफच्या जवानांनी पाकिस्तानच्या तीन मोर्टार रेंज आणि पाकिस्तानच्या चौक्याही उद्ध ्वस्त केल्या आहेत. भारताच्या या थेट कारवाईमुळे पाकिस्तानी सैन्याला बरेच नुकसान झाले आहे. पाकि स्तानकडून काल पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यावेळी काश्मीरमधल्या सांबा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर तैनात असणारा एक सीमा सुरक्षा दलाचा जवान शहीद झाला. 

राधापद हाजरा असे या जवानाचे नाव असून दुर्देवाने कालच त्यांचा वाढदिवस होता. सांबा सेक्टरमधील सीमरेषेजवळ ते तैनात होते. यावेळी पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. यावेळी ते गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयातही नेण्यात आले. पण तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. शहीद जवान आर पी हाजरा हे प. बंगालमधील मुर्शिदाबादमधील असून कालच त्यांचा वाढदिवसही होता. तब्बल 27 वर्ष ते बीएसएफमध्ये कार्यरत होते. त्यांना एक 21 वर्षाची मुलगी आणि 18 वर्षांचा मुलगा आहे. दरम्यान, पा किस्तानच्या गोळीबारानंतर भारतीय जवानांनी देखील चोख प्रत्युत्तर दिले.