अग्रलेख - अपघात रोखण्यासाठी...
राज्यात शनिवार उगवला तो अपघाताच्या बातम्या घेवून. यादिवशी राज्यातच नव्हे देशभरात विविध ठिकाणच्या अपघातात किमान 40 जणांना आपला जीव गमवावा लागला. अपघातांची संख्या मोठया प्रमाणात असून दररोज अपघात घडला नाही, असा दिवस उगवत नाही. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी कठोर उपाययोजनांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. सांगलीतील भीषण अपघातात पाच पैलवानांसाह गाडी चालकांचा मृत्यू झाला तर दुसर्या एका घटनेत ओएनजीसीच्या पाच उपमहाव्यवस्थापकांना तेलाच्या खाणीवर वाहून नेणारे हेलिकॉप्टर डहाणू किनारपट्टीपासून 40 किलोमीटर आत समुद्रात कोसळलं. या हेलिकॉप्टरमधील 2 पायलटसह पाचही प्रवासी मृत्यूमुखी पडल्याची शक्यता आहे. तर तिसर्या घटनेत डहाणूमध्ये 40 विद्यार्थ्यांना घेऊन समुद्रात गेलेली बोट उलटून 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
वास्तविक या घटनाच आपण किती अज्ञानी आणि हलगर्जीपणे वागतो, याचेच द्योतक आहे. रस्त्यावर वाहने चालविंताना आपण कोणतीच खबरदारीचे उपाय घेत नाही. त्यामुळे अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतांना दिसून येत आहे. 127 कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात चारचाकी- टु व्हिलर या वाहनांची संख्या देखील मोठया प्रमाणात आहे. त्यातच वाहन चालविणांरे सगळेच शिक्षित असून, त्यांना तांत्रिक माहिती असते, असे नाही. वाहन चालवितांना इतर माहिती नसल्यामुळे चुका होतात आणि अपघात होतात. विशेष म्हणजे प्रशासनाकडून देखील सुरक्षेच्या उपाययोजना नसलेल्या वाहनांवर/ वाहनचालकांवर कारवाई करतांना हलगर्जीपणा होतो. तसेच वाहनधारकं देखील कोणत्याही खबरदारींच्या उपाययोजनांची काळजी न घेता जीवावर उदार होत वाहने चालवंतान दिसून येतात. त्यामुळे अपघातांची संख्या वाढत चालली आहे. दुसरीकडे समुद्रकिनार्यावर असलेल्या बोटींपासून देखील अनेक अपघात घडतांना दिसून येत आहे. बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसल्यामुळे बोटी उलटण्याचे प्रकार वाढत चालले आहे. त्यामुळे सर्वात प्रथम सुरक्षेच्या दृष्टीने कडक उपाययोजना आपल्याला कराव्या लागतील. त्याची अंमलबजावणी देखील प्रभावीपणे करावी लागतील, तरच अपघाताचे प्रमाण टाळता येईल. विशेष म्हणजे, राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर रस्ते अपघात झाल्यास जखमींना तातडीने वैद्यकीय सेवा दिल्यास बर्याच अपघातग्रस्तांचे प्राण वाचू शकतात. देशात होणार्या अपघातांमध्ये महाराष्ट्राचा नंबर वरचा आहे.
त्यामुळे महाराष्ट्रातील अपघातांमध्ये अनेकांचे प्राण जात आहेत. दहशतवादी हल्ल्यामुळे जाणार्या जीवांपेक्षा दहशतवादी हल्ल्यामुळे प्राण जाणार्यांची संख्या मोठी आहे. राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर ठराविक किलोमीटर अंतरावर ?महामार्ग पोलिसांच्या चौक्या कार्यरत असण्याची गरज आहे. पण सद्यस्थितीत पाहता राज्यातील ?महामार्ग पोलिसांची यंत्रणा आपल्या ?कर्तव्यापासून कोसो दुर गेली आहे. त्या?मुळे राज्य ?महा?मार्गासाठी जाणिवपूर्वक चांगले काम करणार्या पोलीस महासंचालकांची गरज आहे. यापूर्वी राज्यस्तरावार एक दोन अधिकार्यांनी महामार्ग महासंचालक म्हणून काम करतांना आपल्या कामाची छाप सोडली होती. उध्दव कांबळे महामार्ग पोलीस म्हणून कार्यरत असतांना, त्यांनी आपली छाप सोडली होती. त्यामुळे पुन्हा वाहतूक शाखेने सज्ज होवून, अपघातांची संख्या रोखण्यासाठी सज्ज झाले पाहिजे. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना अंमलात आणत, वाहतुकीचे नियम पायदळी तुडविणार्यावर रिवाईचा बडगा उचलावा. तरच वाहतुकदारांना शिस्त लागून अपघात रोखता येईल, अन्यथा पुन्हा एकदा अपघातांत जीव गमवावे लागतील.