सावंतवाडी डम्पिंग ग्राउंडला आग
सिंधुदुर्गनगरी, दि. 25, जानेवारी - जिल्हयाच्या ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून वणवे लागण्याचे सत्र सुरू असतानाच आता शहरातही वणवे लागू लागले आहेत. सावंतवाडी पालिकेच्या आंबोली-बेळगाव मार्गावरील लाडाची बाग जवळील डंपिंग ग्राऊंडला (कचरा डेपो) अज्ञाताने आग लावली. ही आग विझविण्याचे प्रयत्न पालिका प्रशासन करीत होते.
स्वच्छ भारत अभियान कालावधीत या डंपिंग ग्राऊंडला नवी झळाळी प्राप्त झाली आहे. दुर्गंधीपासून हा भाग मुक्त झाला आहे. गेटवर फळाफुलांची रंगबिरंगी पोस्टर्स झळकत आहेत. तसेच गांडुळ खत प्रकल्प साकारला जात आहे. याच दरम्यान अज्ञाताने लावलेल्या आगीमुळे खळबळ उडाली आहे. नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले, डंपिंग ग्राऊ ंडच्या काही भागात आग लावण्यात आली. ही आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. सुदैवाने खत निर्मिती प्रकल्प वाचवू शकलो. मात्र आग लावण्याचे हे कृत्य दुर्दैवी आहे.