पुणे, दि. 25, जानेवारी - मानलेल्या मामाने आणि चुलतभावाने एका 17 वर्षीय तरुणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्याच्या सहकारनगर पोलिसांच्या हद्दीत घडला. संबंधित मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला अटक केली आहे. सहकारनगर पो लिसांनी याप्रकरणी मानलेल्या मामाला अटक केली असून पीडित मुलीचा चुलतभाऊ फरार आहे. पीडित मुलीवर आरोपी मागील पाच वर्षापासून अत्याचार करत होत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार, 2013-14 मध्ये तिचा मानलेल्या मामाने घरात कोणीही नसताना घराचा दरवाजा आतून बंद केला आणि फिर्यादीचे दोन्ही हात रुमालाने बांधून तिच्यावर बलात्कार केला. तर ऑगस्ट 2016 पासून फिर्यादीच्या 26 वर्षीय चुलत भावाने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेऊन गरोदर केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सहकारनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ए .बी. गायकवाड अधिक तपास करीत आहेत.
पाच वर्षापासून अल्पवयीन मुलीवर बलात्कार
Reviewed by Dainik Lokmanthan
on
18:15
Rating: 5