राज्यभरात 85 हजार बुथ; सव्वा कोटी बालकांना पोलिओ डोस पाजण्याचे उद्दिष्ट
मुंबई, दि. 25, जानेवारी - पोलिओच्या समूळ उच्चाटनासाठी राज्यात यावर्षी दि. 28 जानेवारी व 11 मार्च रोजी पोलिओ लसीकरणाची विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे. शून्य ते पाच वर्ष वयोगटातील एक कोटी 21 लाख 29 हजार बालकांना डोस देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी राज्यभरात 85 हजार बुथ उभारण्यात येणार आहेत. येत्या रविवारी बालकांना पोलिओचा डोस पाजून घ्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले आहे.
दरम्यान, आज राज्यस्तरीय टास्क फोर्सची बैठक झाली. लसीकरण मोहिमेसाठी नियोजन व संबंधित विभागांनी करावयाची कार्यवाही बाबत आरोग्य विभागाचे प्रभारी सचिव संजय देशमुख यांनी आढावा घेतला. आरोग्य सेवा आयुक्त डॉ. संजीवकुमार यावेळी उपस्थित होते.1995 पासून पोलिओ निर्मुलन विशेष मोहीम सुरू करण्यात आली. तेव्हापासून राज्यात दोन वेळा विशेष पल्स पोलिओ मोहीम राबविली जाते. पोलिओचे समूळ उच्चाटन होईपर्यंत ही मोहिम सुरू राहणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. यावर्षी रविवार, दि. 28 जानेवारीला ही मोहीम घेण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील पाच दिवस सुमारे 2 कोटी 90 लाख 90 हजार घरांना भेटी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत घरोघरी जाऊन बालकांना डोस पाजण्यात येणार आहे.