Breaking News

नक्षलग्रस्त सालेकसा येथे कबड्डी स्पर्धा उत्साहात

गोंदिया, दि. 12, जानेवारी - स्वदेशी खेळाला चालना मिळावी याकरिता गोंदिया जिल्याच्या नक्षलग्रस्त सालेकसा तालुक्यात तीन दिवसीय आंतराज्यीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या अंतिम सामन्याला हरियाणा स्टिलर्सचे चे प्रो कबड्डीपटू प्रमोद नरवाल आणि बंगलूर बुल्स चे प्रो कबड्डी प्लेयर प्रितम छिलर यांनी विशेष हजेरी लावली ग्रामीण भागात देशी खेळांना जोपासण्याचा प्रयत्न केला जातो. तरी देखील कबड्डी सारख्या राष्ट्रीय खेळाला अजूनपर्यंत तितकेसे महत्त्व मिळालेले नाही. 


त्यामुळे या खेळाला चालना देण्याच्या उद्देशाने गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातल्या भजेपार गावात सूर्योदय क्रीडा मंडळाच्या माध्यामातून गेल्या 9 वर्षांपासून तीन दिवसीय आंतरराज्यीय क बड्डी स्पर्धेचे आयोजन केले जाते. आदिवासी नक्षल बहुल गावातील वयो वृद्ध महिला नऊवारी पातळ नेसून कबड्डी खेळल्यात .तर वृद्ध मंडळींनी देखील धोतर घालून कबड्डीचा आनंद घेतला. तीन दिवस रंगलेल्या या सामन्यात महाराष्ट्र ,मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ राज्याच्या विविध जिल्यातील सुमारे साठहून अधिक चमूनी सहभाग नोंदवला. गेल्या काही वर्षांपासून नक्षली छायेत वावरणा-या ग्रामीण भागात अश्या कबड्डी सामन्यांच्या माध्यमातून समाजात आनंद निर्माण केला जातो आहे.