Breaking News

पती हत्येप्रकरणी पत्नीला प्रियकरासह अटक


ठाणे, दि. 12, जानेवारी - पतीची हत्या करणा-या पत्नी आणि तिच्या प्रियकराला शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे. पत्नी गुलशबा तिचा प्रियकर रिजवान मोहम्मद कुरेशी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, कैफ उर्फ मनोजकुमार उर्फ राहुल जगदीशप्रसाद सोनी असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. गुलशबाने प्रियकर रिजवान याच्या साथीने आपल्या पतीची अत्यंत निर्दयीपणे मुंडके धडावेगळे करून हत्या केली. भिवंडीतील नागाव परिसरात उघडकीस आली. हत्या केल्यानंतर फरार असलेल्या पत्नीसह तिच्या प्रियकराला उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातून पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली. 
अनैतिक संबंधात पती अडथळा ठरत असल्याने पत्नी गुलशबा आणि प्रियकर रिजवान या दोघांनी संगनमत करून मनोजकुमार याचा धारदार शस्त्राने डोके धडावेगळे करून मृतदेह घरातच टाकून फरार झाले.