कोरेगांव भीमा घटनेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी- खा.संभाजी राजे
अकोला, दि. 12, जानेवारी - कोरेगांव-भीमाच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. यामध्ये कोणत्याही धर्माचे-जातीचे व्यक्ती दोषी असले तरी चालेल. त्याचेवर गंभीर कारवाई झाली पाहिजे असे प्रतिपादन खा. संभाजी राजे यांनी अकोला येथे केले. अकोला येथे पत्रकारांशी ते बोलत होते.
यावेळी मराठा आणि दलित समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत काही शक्ती करीत आहेत का, याबाबत विचारणा केली असता, ते सर्व पोलिसांच्या आणि उच्चस्तरीय चौक शीतूनच समोर येईल. फुले-आंबेडकर-शाहू महाराजांच्या महाराष्ट्रात असल्याप्रकारच्या घटना निंदनीय आहेत. यासाठी या थोर पुरूषांचे विचार रूजविण्याची खरी गरज आहे. बहुजन समाजाने शांत राहून समाजात अशा घटना घडू नये यासाठी प्रयत्न करावेत. कोरेगांव-भीमाच्या निमित्ताने दलित-मराठ्यात कुठेही वितुष्ट निर्माण होऊ नये यासाठी आपला प्रयत्न आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत दृष्टीतूनच मी महाराष्ट्रातील अठरापगड जनतेला पाहतो. रायगड प्राधिकरणातून शिवछत्रपतींच्या गडकिल्ल्यांचे संवर्धन केले जाईल. त्यातून येणार्या नवीन पिढीला शिवाजी महाराज काय होते याची कल्पना येईल. कोरेगांव-भीमाच्या घटनेप्रकरणी संभाजी भिडे- मिलींद एकबोटेंवर गुन्हा दाखल झाला. मात्र अटके ची कारवाई नाही असे का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, याचे उत्तर मी नव्हे पोलिस देतील, असे त्यांनी सांगितले.