Breaking News

आधार नोंदणीच्‍या कारणाने लोणीत जेष्‍ठ नागरीकांसह विद्यार्थी, अगणवाडी सेविका व मदतनिस हतबल


गजबजलेल्‍या लोणीत जेष्‍ठ नागरीक, विद्याथी, सर्वसामान्‍य नागरीक व अंगवाडी सेविका, मदतनिस आधार नोदंणीच्‍या कारणाने पुर्णत: हतबल झाले आहेत. लोणीत आधार कार्ड काढण्‍यासाठी शासनमान्‍य दोन कार्यालये होती. परंतू सदर कार्यालये गेल्‍या दोन ते अडीच महीन्‍यापासून बंद असल्याने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी शैक्षणिक कामांसाठी आधार अपडेट व नवीन आधार कार्डची नोंदणी करण्‍यासाठी सेतू कार्यालयात जात आहेत. परंतू सदर कार्यालयात आधार कार्ड काढणे व अपडेट करणे बंद असल्‍याने विद्यार्थ्‍यांची मोठी गैरसोय होत आहे.
जेष्‍ठ नागरीकांना बँकेतून पैस काढण्‍यासाठी राष्‍ट्रीयकृत बँकेच्‍या ग्राहक सेवा केंद्रातून हाताचा टसा दिल्‍याशिवाय डोल किंवा खात्‍यातील पैसे काढता येत नाहीत त्‍यामुळे ग्राहक सेवा केंद्रातील आधिकारी व कर्मचारी त्‍यांना आधार कार्ड अपटेत करण्‍यास सांगतात. आपलेच पैसे काढण्‍यासाठी त्‍यांना सेतू कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत असून, सदर कार्यालयात आधार नोंदणी बंद असल्‍याने जेष्‍ठ नागरीक हतबल झाले आहेत.

अंगणवाडी सेवीका व मदतनीसाचे गेल्‍या 5 ते 6 महीन्‍यापासून पगार जमा झालेले नाहीत. पगार जमा होण्‍यासाठी त्‍यांनाही आधार कार्ड अपडेट करण्‍याच्‍या सुचना वरिष्‍ठांकडून देण्‍यात आल्‍या आहेत. त्‍यामुळे अंगणवाडी कर्मचारी आता लहाण मुलांना शिकवायच सोडून कोल्‍हार येथील आधार केंद्रावर हेलपाटे मारुन 5 ते 6 दिवसांनी त्‍यांचा आधार अपडेट करण्‍यासाठी नंबर लागत आहे.

आधार कार्ड दुरुस्‍त किंवा नवीन काढण्‍यासाठी कोल्हार येथे जावे लागत असून, जेष्‍ठ नागरीकांचा त्‍याचा पुरेसा मनस्‍ताप सहन करावा लागत आहे. कोल्‍हार येथे जावूनही त्‍यांचा नंबर लागत नाही. लागला तर बोटाचे ठसे निट येत नाहीत. त्‍यामुळे लोणीतील आधार केंद्र तातडीने केंद्र तातडीने सुरु करण्‍यात यावे अशी मागणी सर्वच स्‍तरातून होत आहे.