Breaking News

ट्रंम्प दहशतवाद्यांहून अधिक धोकादायक- पिटर कुझनिक

नागपूर, दि. 12, जानेवारी - जगावर दादागिरी करणा-या अमेरिकेच्या अध्यक्षांवर त्यांच्याच देशातील बुध्दीजीवी आता टीकास्त्र सोडू लागले आहेत. डोनल्ड ट्रम्प हे दहशतवाद्यांपेक्षा अधिक धोकादायक असल्याचा आरोप अमेकिरकन विद्यापीठातील प्राध्यापक आणि न्यूक्लिअर स्टडीज इन्स्टिट्यूटचे संचालक पिटर कुझनिक यांनी केला. आपल्या नागपूर दौ-यात ते पत्रकारांशी वार्तालाप करताना बोलत होते. 

यासंदर्भात बोलताना प्रो. कुझनिक म्हणाले की, उत्तर कोरिया व अमेरिका यांच्यामध्ये वातावरण तापले असून या दोघांच्या भांडणात जग अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर उभे ठाकले आहे. अण्वस्त्रसंपन्न देशांमधील शस्त्रांचे नियंत्रण हे तेथील नेत्यांच्या हाती आहे. त्यामुळेच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखे राजकीय नेते हे दहशतवाद्यांपेक्षा अधिक धोक ादायक झाले आहेत. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग ऊन व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अपरिपक्वतेमुळे जगात अणु युद्धाचे ढग दाटले आहे. आजच्या घडीला जगात 14 हजार 700 आण्विक शस्त्रे आहेत. यापैकी 93 टक्के शस्त्रे ही अमेरिका व रशिया यांच्या ताब्यात आहेत.