Breaking News

खारभूमी विकास कार्यालये होणार बंद

सिंधुदुर्गनगरी, दि. 12, जानेवारी - सिंधुदुर्ग खारभूमी विकास विभाग जिल्हा कार्यालय ओरोस, खारभूमी सर्व्हे व अन्वेषण उपविभाग कार्यालय तळेरे ही दोन्ही कार्यालये 31 जानेवारीच्या आदेशान्वये जलसंपदा विभागाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी कार्यालये बंद करण्याचे आदेश निघाले होते. त्यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बंदला स्थगिती दिली होती. आता पुन्हा दोन्ही कार्यालये बंद होण्यापासून थांबवणार का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.


सिंधुदूर्ग खारभूमी विकास विभाग व खारभूमी सर्व्हेक्षण उपविभाग तळेरे या दोन्ही विभागाअंतर्गत खारभूमीची कामे कमी झाली असल्याचे कारण पुढे करीत जलसंपदा विभागाने दोन्ही कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेत या कार्यालयाकडील अधिकारी व कर्मचाऱयांना जलसंपदा विभागांतर्गत रिक्त असलेल्या जागांवर अन्यंत्र सामावून घेतले जाणार आहे.