किनारपट्टी संवर्धनावर बैठकीचे डॉ. सारंग कुलकर्णी यांना निमंत्रण
सिंधुदुर्गनगरी, दि. 12, जानेवारी - गुजरातला किनारपट्टीचे संरक्षण व संवर्धन सागरी पर्यटनाच्या माध्यमातून व्हावे तसेच स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी पर्यावरण मंत्रालयाने गांधीनगर येथे 12 व 13 जानेवारी रोजी बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञांना निमंत्रित करण्यात आले आहे. स्ना ॅर्कलिंग व स्कुबा डायव्हिंगच्या माध्यमातून सागरी विश्व पर्यटकांना खुले करणारे सागरी संशोधक डॉ. सारंग कुलकर्णी यांना गुजरात सरकारने या बैठकीला मार्गदर्शक म्हणून निमंत्रित केले आहे. ते बैठकीत सागरी पर्यटनविषयक नवीन संकल्पना मांडणार आहेत.
डॉ. कुलकर्णी यांनी मालवण किनारपट्टीवरील सागरी पर्यटनाद्वारे पर्यटनाचे अनोखे विश्व सर्वांसमोर आणले. स्नार्कलिंग व स्कुबा डायव्हिंगच्या माध्यमातून पाण्याखालचे विलोभनीय विश्व पर्यटकांना पाहता येऊ लागले. स्नॉकलिंग व स्कुबा डायव्हिंगचा आनंद लुटण्यासाठी मोठया संख्येने पर्यटक मालवण किनारपट्टीवर येऊ लागले. सिंधुदुर्ग किल्ल्याचे दर्शन घेतल्यानंतर पर्यटक स्कुबा व स्नॉकलिंगचा आनंद लुटण्यासाठी जातात. त्यामुळे साहजिकच मालवण किनारपट्टीवरील पर्यटन बहरले. स्नॉर्कलिंग व स्कुबा डायव्हिंगच्या माध्यमातून किनारपट्टीवरील स्थानिक युवकांना रोजगाराचे साधन निर्माण झाले.