प्रवरा ग्रामीण औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय व सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ यांच्या संयुंक्त विद्यमाने आयोजित विशेष हिवाळी शिबिराचे उदघाटन मौजे हसनापूर येथे नुकतेच करण्यात आले, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील निर्मळ यांनी दिली. या शिबीर कालावधीत शिबिरार्थी वृक्षारोपण, स्वछता अभियान, कन्या रत्न अभियान, कॅशलेस इंडिया जनजागृती, युवा सप्ताह असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. उदघाटनप्रसंगी बुशारा पटेल, अब्बास पटेल, रियाज पटेल, सलीम पटेल, समीर पटेल आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. आर. एस. जाधव यांनी केले. प्रारंभी विद्यार्थ कल्याण अधिकारी प्रा. एस. डी. मनकर यांनी प्रास्तविक केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. आर. के. गोडगे, डॉ. भवर, डॉ. नचिकेत दिघे, एम. बी. अंत्रे आदींनी पुढाकार घेतला.
हिवाळी शिबिराचे उदघाटन उत्साहात
Reviewed by Dainik Lokmanthan
on
09:41
Rating: 5