Breaking News

भौगोलिक माहिती प्रणाली मानवाच्या प्रगतीसाठी वरदान : मालपाणी


संगमनेर/प्रतिनिधी । भूगोल विषयात तंत्रज्ञानामुळे प्रगतीची झेप सर्वत्र होताना दिसते. तसेच सदूर संवेदन व भौगोलिक माहिती प्रणाली मानवाच्या प्रगतीसाठी वरदान ठरत आहे, असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गुणवत्ता सुधार विभाग व संगमनेर महाविद्यालयाच्या भूगोल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'रिमोट सेन्सींग ऍण्ड जीआयएस राष्ट्रीय परिषदेच्या' उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) येथील डॉ. सुयश कुमार, शि. प्र. संस्थेचे सचिव डॉ. अनिल राठी, भूगोल अभ्यासक प्रो. रविंद्र जायभाय, प्राचार्य डॉ. के. के. देशमुख, उपप्राचार्य श्रीहरी पिंगळे, डॉ. अमित धोर्डे, डॉ. प्रमोदकुमार हिरे, डॉ. विजय भगत, डॉ. सुभाष निकम, डॉ. शशिकांत कुमार, गोवा येथील डॉ. एफ. एम. नदाफ, कार्यशाळेचे समन्वयक प्रा. रविंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) येथील डॉ. सुयश कुमार म्हणाले, की आज जल ही जागतिक समस्या बनली आहे. जलसंवर्धनाचा अभ्यास करणे काळाची गरज आहे. सदूर संवेदन व भौगोलिक माहिती प्रणाली तंत्रज्ञान सर्व आंतरविद्याशाखांना साधनसंपत्ती संवर्धनात व राष्ट्र उभारणीसाठी म्हणून प्रभावीपणे कार्य करते. यासाठी सर्व शाखेतील संशोधकांनी या तंत्राचा उपयोग राष्ट्र विकासासाठी प्रभावीपणे कसा करता येईल याकडे लक्ष केंद्रीत केले पाहिजे.

यावेळी प्राचार्य डॉ. के. के. देशमुख, प्रा. रविंद्र गायकवाड आदींनी मार्गदर्शन केले. प्रारंभी प्रा. रविंद्र गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. संजय नवले यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सचिन कदम व प्रा. चिन्मय तिवारी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. शशिकांत बैरागी, प्रा. संदीप देशमुख, प्रा. सागर डोंगरे, प्रा. किरण कारंडे, प्रा. राहुल गायकवाड, प्रा. कोमल सिंह, सचिन चौधरी, श्रीकांत जाधव, संजय काशिद, पठाडे व कुदळ यांनी परिश्रम घेतले. प्रा. डॉ. साईनाथ आहेर यांनी आभार मानले.