आशुतोष काळेंनी तहसील कार्यालयाला दिली बाके
कोपरगाव ता. प्रतिनिधी :- तालुक्याच्या कानाकोप-यातून सरकारी कामानिमित्त तहसील कार्यालयात दररोज हजारो नागरिक येत असतात. यामध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. या सर्वांना येथे बसण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था नव्हती. ही बाब ध्यानात घेऊन आशुतोष काळे यांनी येथे येणाऱ्या अभ्यागतांची गैरसोय होऊ नये, यासाठी बाके भेट दिली.
माजी आ. अशोकराव काळे यांच्या कार्यकाळात त्यांच्या अथक प्रयत्नातून कोपरगाव शहरात अनेक शासकीय इमारती उभ्या राहिल्या आहेत. या शासकीय इमारतींनी कोपरगाव शहराच्या वैभवात भर घातली. या इमारतींमध्ये तहसील कार्यालयाच्या भव्य इमारतीचा सामावेश आहे. या तहसील कार्यालयाच्या इमारतीमध्ये मागील वर्षांपासून प्रशासकीय कामास सुरुवात झाली. मात्र या तहसील कार्यालयात काही सोयी सुविधांचा अभाव होता. या परिसरात ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बाके नसल्यामुळे काम पूर्ण होईपर्यंत तासन तास ताटकळत उभे रहावे लागत होते. ही अडचण लक्षात घेऊन काळे यांनी नुकतेच कोपरगाव तहसील कार्यालयात १५ बाके दिली. कोपरगावचे तहसीलदार किशोर कदम यांनी या भेटीचा स्विकार केला. यावेळी पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती, सर्व सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व जिल्हा परिषद सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरसेवक तसेच कोपरगाव शहर व तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.