Breaking News

सावंतवाडीचे पत्रकार पुरस्कार जाहीर

सिंधुदुर्ग, दि. 04, जानेवारी - सावंतवाडी तालुका पत्रकार समितीच्यावतीने देण्यात येणार्‍या विविध पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. सावंतवाडी शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीनंतर हा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. लवकरच कार्यक्रम घेवून हे पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे असे सचिव टेंबकर यांनी सांगितले.


सावंतवाडी तालुका पत्रकार समितीच्यावतीने दरवर्षी देण्यात येणारे वैनतेयकार मे.द. शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार , छायाचित्रकार अनिल भिसे यांना जाहीर करण्यात आला आहे, तर पांडुरंग स्वार यांच्या नावाने दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार जेष्ठ पत्रकार चंदू सावंत यांना मरणोपरान्त जाहीर करण्यात आला आहे. माजी आमदार जयानंद मठकर स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणारे आदर्श पुरस्कार सिंदूधुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य अशोक करंबळेकर यांना, जेष्ठ पत्रकार बाप्पा धारणकर आदर्श पुरस्कार अनिल चव्हाण यांना तर सामाजिक कार्यकर्ते कै. चंदू वाडीकर यांच्या नावाने दिला जाणारा आदर्श समाजसेवक पुरस्कार दत्तप्रसाद पोकळे यांना जाहीर करण्यात आला. 

सावंतवाडी पत्रकार संघाच्यावतीने नेमण्यात आलेल्या निवड समितीची बैठक येथील शासकीय विश्रामगृहावर आज सकाळी पार पडली. यावेळी तालुकाअध्यक्ष विजय देसाई, सचिव अमोल टेंबकर, जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य संतोष सावंत समिती सदस्य माजी आमदार राजन तेली,नगराध्यक्ष बबन साळगावकर,पंचायत समिती सभापती रविंद्र मडगावकर आदी उपस्थित होते. यावेळी अन्य पत्रकारांच्या नावावर चर्चा झाली. यातुन हे पुरस्कार विजेते निवडण्यात आले आहेत. लवकरच कार्यक्रम घेवून हे पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे, असे सचिव टेंबकर यांनी सांगितले.