Breaking News

चोरलेल्या नंदीबैलाची तस्करी करतांना तीन जणांना अटक


ठाणे - कल्याणमध्ये एक नंदीबैलाची चोरी करुन त्याला कत्तलखान्यात नेतांना तीन तस्करांना अटक करण्यात आली आहे. कल्याणच्या एपीएमसी मार्केटमधून हा नंदी बैल चोरण्यात आला होता. या नंदीबैलाला तस्करांनी खालापूर इथे नेऊन कसायाकडून त्याची कत्तल केल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी इमरान वल्ली शेख, सलमान पटेल, तनजीब शकील शेख या तिघांना अटक केल्याचे सांगण्यात येत आहे.