Breaking News

भारत-म्यानमार सीमेलगत भूकंप .


नवी दिल्ली : भारत-म्यानमार सीमेलगतच्या मणिपूरमध्ये ६.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याने रविवारी खळबळ उडाली. सुदैवाने या भूकंपामुळे जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही. दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांदरम्यान झालेल्या या तीव्र भूकंपाचा केंद्रबिंदू भारत-म्यानमार सीमेलगत भूगर्भात ३५ किलोमीटर खोलीवर नोंदवण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपमापन केंद्राच्या अधिकाऱ्यांनी दिली.