अमरावती : तलावात बुडाल्याने अभियांत्रिकीच्या चार विद्यार्थ्यांना जलसमाधी मिळाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी आंध्र प्रदेशच्या पश्चिम गोदावरी जिल्ह्यात घडली. एलुरू येथील रामचंद्र अभियांत्रिकी महाविद्यालयातील काही विद्यार्थी पेरू आणण्यासाठी वटलुरू गावात गेले. यावेळी काही विद्यार्थी पोहण्यासाठी गावानजीकच्या तलावात उतरल्यानंतर ही घटना घडली. अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षातील कोटा साई व तृतीय वर्षातील जी. विजया शंकर, के. हरिकृष्ण राजू, एएसके परशुराम अशी मृतांची नावे आहेत.
चार विद्यार्थ्यांना जलसमाधी.
Reviewed by Dainik Lokmanthan
on
10:58
Rating: 5