Breaking News

‘हुतात्मा’ची इथेनॉलमुळे आर्थिक संकटावर मात- वैभव नायकवडी

सांगली, दि. 31, जानेवारी - बाजारात साखरेचे दर घसरलेले आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्यांना योग्य तो ऊसदर सहकारी साखर कारखाने देऊ शकत नाहीत. अशा प्र तिकूल परिस्थितीतही हुतात्मा सहकारी साखर कारखान्याने इथेनॉल निर्मिती करून आर्थिक संकटावर मात करण्याचा प्रयत्न केला आहे, असे प्रतिपादन साखर कारखाना अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी केले.


साखर कारखान्याच्या सन 2017- 18 या गळीत हंगामात उत्पादित झालेल्या 20 हजार लिटर इथेनॉलच्या विक्री शुभारंभात वैभव नायकवडी बोलत होते. यावेळी साखर कारखाना उपाध्यक्ष बाबूराव बोरगावकर, संचालक मारूती पाटील, डॉ. संताजी घोरपडे, माणिक कदम, अण्णासाहेब मगदूम, हेमंत कदम, हुतात्मा सहकारी दूध संघाचे उपाध्यक्ष भगवान पाटील, अजित वाजे व प्रभारी कार्यकारी संचालक दीपक पाटील आदी उपस्थित होते.