मुंबई : डॉकयार्ड रोड येथील जमेरिया बिल्डिंगमधील एका गोदामाला काल मध्यरात्री आग लागली. या आगीमध्ये सात दुकाने जळून खाक झाली असून जीवितहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या दाखल झाल्या होत्या. जमेरिया बिल्डिंगमधील गोदामाला रात्री सव्वा बारा वाजताच्या सुमारास आग लागली. त्यानंतर अग्निशमन दलाचा जवानांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवून आग विझवली. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
मुंबईत आगीचे सत्र, रे रोड परिसरातील गोदामे भस्मसात
Reviewed by Dainik Lokmanthan
on
12:18
Rating: 5