पाथर्डीत संत वामनभाऊ पुण्यतिथी साजरी
शहरातील भाविकांच्या वतीने संत वामन भाऊंच्या पुण्यतिथी निमीत्त आनंदनगर मधील मंडळाकडून उत्सवाचे आयोजन करण्यात आले. संत भगवानबाबा व संत वामनभाऊ यांच्या प्रतिमेची शहरातुन वाजत गाजत मिरवणुक काढण्यात आली. रथ, कलशपथक, भजनी मंडळ, घोडेस्वार, बॅंड पथक मिरवणुकीत सहभागी झाले. ग्रामसेवक संघटनेच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
आनंदनगर मध्ये भाविकांनी लोकवर्गणीतुन भव्य मंदिराचे काम पूर्ण केले असून शिखराच्या कामाला प्रारंभ झाला आहे. यासाठी भाविकांना मदतीचे आवाहन समितीतर्फे करण्यात आले. उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, माजी नगराध्यक्ष सुभाष घोडके, पंचायत समीती सदस्या सुनिता दौंड, येळीचे सरपंच संजय बडे , ह.भ.प.नामदेव बडे महाराज आदि प्रमुख उपस्थीत होते. तालुक्यातील येळी येथेही गेल्या २१ वर्षापासुन पुण्यतिथी उत्सवाचे आयोजन केले जाते. पाथर्डीच्या उत्सवाचे यंदाचे अकरावे वर्ष आहे.
