संत नागेबाबा मल्टीस्टेट शाखेने दिले ७० महिला बचत गटास कर्ज वितरण
नागेबाबा मल्टीस्टेट शाखा कार्यलयात बुधवारी महिला बचत गटांना कर्ज वितरण व मार्गदर्शन सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध महिला बचत गटाच्या सदस्या उपस्थित होत्या. जेऊर हैबती येथील पावन गणेश महिला बचत गटास असि.जनरल मनेजर यशवंत नाकाडे यांच्या हस्ते एक लाख रुपयाचे कर्ज वितरण केले. या बँकेच्या अंतर्गत कुकाणा शहरातील नागरिक,व्यापारी ,तसेच परिसरातील खेडेगावातील शेतकरी वर्ग यांच्यासाठी विविध समाज उपयोगी उपक्रम घेण्यात येत आहे . या अंतर्गत बँकेचे संस्थापक अध्यक्ष कडूभाऊ काळे ,जनरल मनेजर अमित फिरोदिया , असि.जनरलमॅनेजर यशवंत नाकाडे यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी,समृध्द व आर्थिक साक्षर करण्यासाठी " बचत गट कर्ज योजना" सुरू करण्यात आली.आज पर्यत कुकणा शाखेने एकुण ७० महिला बचत गटांना ७० लाख रुपये कर्जाचे वितरण केले आहे.
कर्ज वितरण बाबत माहिती देताना मॅनेजर यशवंत नाकाडे सांगितले की, बचत गटाची कर्ज प्रक्रिया एकदम सरळ –सोपी व कमीत कमी व्याज, कागदपत्रे अशी आसुन ५ महिलांच्या एका बचत गटाला १ लाख रुपये कर्ज वाटप, प्रत्येक महिलेस 20 हजार कर्ज देण्यात येते .त्यासाठी प्रत्येक महिलेस कर्जाचे फक्त रु.१५६०/- व्याज जाते . या कर्ज योजनेतुन महिलांना रोजगार ,व्यवसाय, उपलब्ध करून त्यांना आर्थिक पाठबळ देण्याचे काम नागेबाबा बँक पुढील काळात करणार आहे . आज पर्यत नागेबाबा बँके मार्फत ५०० महिला बचत गटास कर्ज वितरण करण्यात आले. येणाऱ्या पुढील काळात १ लाख महिला बचत गट तयार करण्याचे बँकेचे उद्दिष्ट ठेवलेले आहे . तसेच बचत गटांसाठी वेळोवेळी मार्गदर्शन मेळावे व बचत गटा मार्फत उत्पादित मालास विक्री करण्यासाठी वेगवेगळे प्रदर्शन व बाजारपेठ तयार करण्याचे काम बँकेमार्फत करणार आहे. ज्या महिला बचत गटास आर्थिक साह्याची आवश्यकता आहे. त्यांनी आपल्या जवळच्या शाखेत संपर्क करण्याचे आवाहन केले. यावेळी शाखेचे कर्मचारी योगेश गिरी, राजेंद्र कपिले, लक्ष्मण गव्हाणे, योगेश गोसावी आदि उपस्थित होते.
