चाळीस गावांच्या सुरक्षेसाठी फक्त सहा पोलिस कर्मचारी
मिरजगाव हे नगर- सोलापूर महामार्गावरील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे गाव म्हणुन ओळखले जाते. तसा विचार करता गावची लोकसंख्या तीस हजाराच्यावर आहे तर मिरजगाव येथील पोलीस दुरक्षेत्राच्या हद्दीमध्ये येणारी चाळीस गावे असा मिळुन ऐंशी हजार लोकसंख्या असणा-या लोकांचा कारभार पहाण्याकरीता अवघ्या सहा पोलीस कर्मचारी नियुक्त आहे. सहापैकी दोन किंवा तीन कर्मचा-यांना शासकीय कामानिमित्त वारंट बजावणे, कोर्टामध्ये अडली किंवा साक्ष नोंदवीणे, तपासाकरीता बाहेर म्हणजे परराज्यात आरोपी पकडणे किंवा अपघातातील वाहने ताब्यात घेण्यासाठी, तर ३२ किलोमीटर हायवे वर कोठेही अपघात घडल्यास दोन- तीन कर्मचा-यांना हातातील कामे सोडुन पळापळ करून अपघातग्रस्तांना मदत करावी लागते . स्थानिक किंवा नगर येथील दवाखान्या पर्यंत पोहचविण्यास पाच ते सहा तास वेळ द्यावा लागतो . तो पर्यंत महामार्ग असल्याने दुसरे काहीतरी घडते, अन् पोलीस दादाच्या नाकीनऊ येते.
मिरजगाव पोलीस दुरक्षेत्र हे गेली पन्नास वर्षांपासुन भाडेतत्वावर खाजगी जागेत आहे . मिरजगाव पोलीस दुरक्षेत्र मधुन चाळीस गावांच्या ८० हजार लोकांचा कारभार करत असतांना, येथे नियुक्तीस असणारे पोलीस कर्मचारी यांचा अपु-या कर्मचा-या मुळे जीव मेटाकुटीस येतो . मिरजगाव पोलीस स्टेशन व्हावे व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीया करीता हेडकॉर्टर व्हावे. या सर्व गोष्टींचा विचार करता राज्य सरकार कडुन पाठपुरावा करून व मंजुरी मिळुन देखील, मिरजगाव करांच्या पदरी निराशाच पडली आहे. मिरजगाव येथे पोलीस स्टेशन करीता दक्षिण मुखी मारूती मंदिरा समोर नियोजीत जागेचे भुमीपुजन 2001साली तत्कालीन पोलीस अधिक्षक तुकाराम चव्हाण यांनी मिरजगावचे माजी सरपंच दिवंगत डॉ सूर्यकांत गोरे यांच्या समवेत या मिरजगाव पोलीस स्टेशन तातडीने व्हावे म्हणुन, त्या जागेचे भुमिपुजन केले. या गोष्टीला सोळा सतरा वर्ष झाली. परंतु महामार्गावर गरजेचे असलेले मिरजगाव पोलिस स्टेशन हे फक्त हवेतच लाल फितीमध्ये अडकले आहे .
पालकमंञ्याना देखील गंभीरपणे घेणे गरजेचे आहे . मिरजगाव मतदार संघामधुन पाच वर्ष आमदार, नंतर तीन वर्षांपासुन, भाजपा सरकार मध्ये मंत्रीपद व जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा राम शिंदे, हे एक महाराष्ट्र सरकार मध्य मुख्यमंत्री फडनवीस यांचे जवळचे समजले जातात. मात्र सगळ्या गोष्टी अनुकूल असतांना देखील, नगर-सोलापुर महामार्गावर मिरजगाव पोलीस स्टेशन अध्याप पर्यंत होऊ शकलेे नाही, ही खेदाचीच बाब म्हणावी लागेल. मिरजगाव पोलीस दुरक्षेत्रा मधील हद्दीत चाळीस गांवाचा कारभार असुन यामध्ये प्रामुख्याने मिरजगाव, माही, जळगाव, बाभुळगाव खा, नागलवाडी, नागापुर, शितपुर, रातंजन, तिखी, बेलगाव, घुमरी, रमजान चिंचोली, रोटेवाडी, गावडेवाडी ,थेटेवाडी, निंबोडी, तरडगाव, नवसरवाडी, गंगेवाडी, वाघनळी, निमगाव गांगर्डा, मांदळी, खांडवी, कोंभळी, चांदा, शिंदा, बिटकेवाडी , गुरूपिप्री , डिकसळ, चिंचोली काळदात, गोंदर्डी, थेरगाव, नागमठाम, आदि गावांचा कारभार पाहण्यासाठी येथील पोलीस बळ कमी पडत असल्याने मिरजगाव दुरक्षेत्राचे लवकरात लवकर महामार्गावरील पोलीस स्टेशन व्हावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे,