महात्मा फुले कृषि विद्यापीठात अविष्कार स्पर्धा
या स्पर्धेत राज्यातील कृषि व अकृषि असे एकूण २० विद्यापीठांचे ९६० विद्यार्थी विविध संशोधन प्रकल्प सादर करणार आहेत. विद्यार्थ्यांबरोबर ४० संघनायक सहभागी होणार आहेत. स्पर्धेतील संशोधन प्रकल्पांचे मूल्यमापन करण्यासाठी परराज्यातून ३६ तज्ञ परीवेक्षक बोलविण्यात आलेले आहेत. या संशोधन स्पर्धेमध्ये विविध विभागात विद्यार्थी त्यांचे संशोधन प्रकल्प सादर करणार आहेत. यावेळी विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. किरण कोकाटे, अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, संचालक संशोधन डॉ. शरद गडाख आदी उपस्थित राहतील.
