कोर्हाळे प्रतिनिधी - राहता तालुक्यातील वाळकी येथील पीर बाबासाहब दर्गा संदल व उरूसला आजपासून {दि.११} मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. गावातील सर्वधर्मियांचे जागृत देवस्थान असलेल्या या देवस्थानच्या यात्रौत्सवानिमित्त उद्या {दि.१२}रात्री नऊ वाजता बारामती येथील प्रसिद्ध ऑर्केस्ट्रा ‘धुमाकूळ’चे सादरीकरण होणार आहे. यात्रौत्सवात ग्रामस्थांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन वाळकीचे पोलीस पाटील शामराव शिरोळे, सरपंच संध्याराणी शिरोळे, उपसरपंच हमीदा युनुस शेख, पीर बाबासाहब उरूस कमिटीचे अध्यक्ष युनुस शेख आदींनी केले आहे.
पीर बाबासाहब दर्गाहच्या यात्रौत्सवाला प्रारंभ
Reviewed by Dainik Lokmanthan
on
10:43
Rating: 5