शिर्डी / प्रतिनिधी :- शिवाजी महाराजांच्या यशात जिजाऊची प्रेरणा होती. चांगल्या मार्गदर्शनामुळे ३५० वर्षानंतरही महाराजांचे नाव घेतले जाते. समाजासाठी जीवन समर्पित करणाऱ्या संतांचे ७०० वर्षानंतरही नाव घेतले जाते. मात्र आज समाजात विचित्र असा विरोधाभास पहायला मिळतो आहे. डी. जे. समोर बेभान होऊन नाचणारा २२ वर्षांचा तरुण लग्नानंतर आई-वडिलांना घराबाहेर काढतो. मात्र चांगले संस्कार असतील तर ३५० वर्षानंतरही समाज विसरत नाही, असे प्रतिपादन ह. भ. प. संभाजी महाराज तूरकणे यांनी केले.
चांगले संस्कार समाज विसरत नाही : ह. भ. प. तूरकणे
Reviewed by Dainik Lokmanthan
on
16:16
Rating: 5