Breaking News

विजय मल्ल्या फरार घोषित


नवी दिल्ली : भारतीय स्टेट बँकेसह अनेक सार्वजनिक बँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवणारा कुख्यात मद्यसम्राट विजय मल्ल्याला परदेशी चलन विनिमय अधिनियमाची (फेरा) पायमल्ली केल्याप्रकरणी अखेर दिल्ली न्यायालयाने गुरुवारी फरार घोषित केले आहे. त्यामुळे त्याच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. 
सातत्याने समन्स बजावल्यानंतरही सुनावणीस गैरहजर राहणाऱ्या विजय मल्ल्या विरोधात दिल्लीचे महानगर न्यायदंडाधिकारी दीपक शेरावत यांनी कठोर आदेश पारित केले आहेत. गेल्या महिनाभरापासून माल्या सुनावणीसाठी चुचकारा देत आहे. तसेच म्ल्ल्ल्याची बाजू मांडणारा कोणताही वकील सुनावणीला हजर राहत नाहीय. त्यामुळे त्याला अखेर फरार घोषित करण्यात येत असल्याचे न्यायमूर्तींनी सांगितले.