मुख्य अभियंत्यांना भंगार चोरीच्या अहवालाची प्रतिक्षा
उपअभियंत्यांसह अधिक्षक अभियंता अज्ञातवासात ; भ्रष्ट सहकार्यांना वाचविण्यासाठी खेळी असल्याचा संशय, भंगारविक्री प्रकरणातील माजी शाखा अभियंता गाजरे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून, ते सध्या हॉस्पिटमध्ये दाखल आहेत.
मुंबई /विशेष प्रतिनिधी : मुंबई सार्वजनिक बांधकाम शहर इलाखा विभागात एका बाजूला कार्यकारी अ भियंत्यांवर भ्रष्टाचाराचा ठपका असणारा अहवाल जाणीवपुर्वक दुर्लक्षित ठेवला जातो तर दुसरीकडे ऐंशी लाखाचे भंगार चोरणार्या शाखा अभियंत्याला दोषी ठरविणारा अहवाल ज्यांच्या कस्टडीत आहे त्यांची भु मिगत भुमिका मुख्य अभियंत्यांना अहवालाची प्रतिक्षा करण्यास भाग पाडते. ही विसंगती सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्ट अभियंत्यांची साखळी कशी एकमेकात गुंफली आहे याचे उदाहरण मानले जात आहे.
इलाखा सार्वजनिक बांधकाम विभागाचा भ्रष्टाचार एका विशिष्ट उंचीवर पोहचल्यानंतर चोरांच्या दिंडीतील वारकरी एकमेकांना सावरण्यास पुढाकार घेत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.मंत्रालय, आकाशवाणी, मनोरा आमदार निवास इमारत, निविदा न काढता विविध कामांची रेलचेल, बोगस निविदा तयार करून कंत्राटदाराच्या नावावर काढलेल्या देयकांची अफरातफर अशा विविध गैरप्रकारात कार्यकारी अ भियंता प्रज्ञा वाळके यांच्यावर चौकशी अहवालात ठपका ठेवला गेल्यानंतरही कारवाई करण्यात टाळाटाळ करून साबां प्रशासनाने भ्रष्टाचाराच्या साखळीशी असलेली निष्ठा कायम राखली. विधीमंडळात प्रचंड गदारोळ होऊनही कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांना सर्व स्तरावर सावरण्यात पुढाकार घेतला गेला.
एका बाजूला प्रज्ञा वाळके दोषी असल्याचा अहवाल सादर होऊनही कारवाई टाळली गेली तर दुसर्या बाजूला उच्च न्यायालय सेवा केंद्रातील ऐंशी लाखाचे भंगार चोरण्याची घटना उघड झाल्यानंतर या ठिकाणी कार्यरत असलेले शाखा अभियंता विजय बापट यांच्या कर्तृत्वावर प्रकाशझोत टाकणारा अहवाल उपअ भियंता शशीकांत घाडगे यांनी अधिक्षक अभियंता सुर्यवंशी यांना सादर केला. डोक्यावरचा भार खांद्यावर आणल्याचे समाधान मानत त्यांनी अज्ञातवास स्वीकारला. अहवाल सादर करून ते गायब झाल्याने सार्वज निक बांधकाम विभागात वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे.
अहवाल सादर करणारे उपअभियंता गायब झाल्याची चर्चा होत असतानाच ज्यांनी हा अहवार स्वीकारला ते अधिक्षक अभियंता सुर्यवंशी हे देखील बेपत्ता झाले असल्याने या अहवालावर कारवाई काय करायची कशी करायची? ही चिंता मुख्य अ भियंत्यांना भेडसावत आहे. अधिक्षक अभियंता सुर्यवंशी यांनी अहवाल स्वीकारला, आपल्या कस्टडीत ठेवला आणि त्यांचे दर्शन दुर्लभ झाले. मुख्य अभियंता केडगे या अहवालाच्या प्रतिक्षा करीत आहेत.
थोडक्यात एका प्रकरणात अहवाल हाती असूनही कार्यकारी अभियंत्यावर कारवाई केली जात नाही तर दुसर्या बाजूला मुख्य अभियंत्यांपर्यंत अहवाल पोहचू नये म्हणून अहवार सादर करणारे उपअभियंता आणि अहवाल स्वीकारणारे अधिक्षक अभियंता जाणीवपुर्वक अज्ञातवासात जातात, अहवाला हातात नसल्याने कारवाई करणे मुख्य अभियंत्यांना शक्य होत नाही. अशी विचित्र परिस्थिती साबां भ्रष्टाचारावर होणार्या संभाव्य कारवाईची झाली आहे. हा योगायोग नाही तर आपल्या भ्रष्ट सहकारी अभियंत्यांना वाच विण्यासाठी खेळलेली खेळी असल्याची चर्चा साबांत सुरू आहे.
