नागपुरात बंदमुळे ‘एसटी’ला 30 लाखांचा फटका
नागपूर, दि. 04, जानेवारी - महाराष्ट्र बंदचा एसटी महामंडळाला नागपूर विभागात तब्बल 30 लाख रुपयांचा फटका बसला आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर महामंडळाला तब्बल 539 फे-या रद्द कराव्या लागल्यात. तर आंदोलनातरम्यान 3 बसेसची तोडफोड करण्यात आली.
बंदच्या पार्श्वभूमीवर मुंबई मुख्यालयाने एसटीच्या विभाग नियंत्रक कार्यालयाला पोलिसांच्या सूचनेनुसार बसेस चालवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सकाळी 8 वाजेपर्यंत एसटी महामंडळाच्या फे-या नियमित सोडण्यात आल्या. नागपूर विभागात गणेशपेठ, घाट रोड, इमामवाडा, वर्धमाननगर, उमरेड, काटोल, रामटेक, सावनेर असे 8 डेपो आहेत. या आठही डेपोतून दिवसाकाठी 1140 बसफेर्या सोडण्यात येतात. परंतु बंदमुळे यातील 601 फेर्याच आगाराच्या बाहेर गेल्या. तर 539 फेर्या रद्द कराव्या लागल्यात. यात महामंडळाला विभागात 30 लाखाचा फटका बसल्याची माहिती अधिकार्यांनी दिली.

आगाराबाहेर गेलेल्या तीन बसेसची तोडफोड आंदोलकांनी केली. यात तुमसर आगाराची एम. एच. 20 डी-9319 ही बस गंगाबाई घाटाजवळ, घाट रोड आगाराची एम. एच. 40 एन-8207 क्रमांकाची बस वानाडोंगरीच्या राजीवनगर भागात आणि 810 क्रमांकाची बस कामठी येथे फोडण्यात आली. बसची तोडफोड झाल्यामुळे दुपारी एसटीने आपल्या बसेसची वाहतूक थांबविण्याचा निर्णय घेतला. बंद असल्यामुळे बहुतांश प्रवाशांनी आपला प्रवासाचा बेत आधीच रद्द केलेला होता.