Breaking News

वर्सोवा बीचवरील सफाईसाठी अमिताभ बच्चन यांच्याकडून ट्रॅक्टर भेट !


मुंबई, - वर्सोवा बीचवरील सफाईसाठी पुढाकार घेणारे पर्यावरणप्रेमी अफरोज शाह यांना अभिनेते अमिताभ बच्चन यांनी खोदकामासाठी एक्सकॅवेटर (जेसीबी) आणि ट्रॅक्टर भेट दिला आहे. ट्विटरवर छायाचित्र शेअर करुन अमिताभ बच्चन यांनी यासंदर्भात ही माहिती दिली आहे. दरम्यान, अफरोज शाह यांनीही ट्विट करून अमिताभ यांचे आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचे स्वच्छतादूत असलेल्या अमिताभ बच्चन यांनी वर्सोवा बीचच्या स्वच्छतेसाठी मदतीचा हात लावला आहे.