सर्वपक्षीयांच्या वतीने झालेला सत्कार मनाला ऊर्जा व शक्ती देत राहील-यशवंतराव गडाख
वयाची पंचाहत्तर वर्षे पूर्ण केल्याबद्दल नेवासा येथे जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचा अमृत महोत्सवी सन्मान म्हणून नागरी सत्काराचे सर्वपक्षीयांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.यावेळी नागरी सत्कार सोहळा संयोजन समितीच्या वतीने उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी उपस्थित सर्वपक्षीय नागरिकांचे स्वागत करून प्रास्ताविक केले . जेष्ठ विधीतज्ञ अँड.के.एच.वाखुरे यांनी यशवंतराव गडाख यांच्या जीवनावर रचलेल्या कवितेचे वाचन केले. तर नितीन ढवळे यांनी सर्वपक्षीयांच्या वतीने देण्यात येणाऱ्या सन्मान पत्राचे वाचन केले .
यावेळी सर्वपक्षीयांच्या वतीने जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचा नागरी सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देतांना गडाख म्हणाले की सर्व सामान्य माणसाचे दुःख हलके व्हावे म्हणून म्हणून राजकारणात आलो परिसराच्या फायद्यासाठी संस्था उभ्या केल्या पक्षाच्या बाहेर जाऊन जग व समाज बघितला,निवडणुका हया येतात आणि जातात राजकारण हे राजकारणापाशीच ठेवा नंतर पुन्हा गावाच्या विकासासाठी एकत्रित या असे आवाहन करतांना ते म्हणाले की आम्ही सत्तरव्या साहित्य संमेलनाची धुरा खांद्यावर घेतल्यानंतर तत्कालीन शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना बोलाविले. तसेच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन माझ्या हस्ते झाले. लोकसभेत एकमेकांवर तुटून पडणारे आम्ही सर्व जण पुन्हा चहा पिण्यासाठी एकत्र येत. हाच दृष्टिकोन मी आयुष्यभर मी जपल्याचे त्यांनी विविध दाखले देत सांगितले.
माणसाने जीवनात स्वप्ने अवश्य पहिली पाहिजे मी ही पाहिली व ती प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न केला. शिक्षणाची त्यावेळची स्थिती हलाखीची असल्यामुळे शिक्षण संस्था उभ्या केल्या. आज वीस वर्षांमध्ये याच संस्थेतून ८० हजार मुले मुली शिक्षण घेऊन बाहेर पडली. हा सर्वात मोठा आनंद मला झाल्याचे स्पष्ट करताच आज मुलामुलींचे शिक्षणाचे पन्नास टक्क्यांवर आल्याची खंत ही त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली. आज माझी कर्मभूमी असलेल्या नेवासा नगरीमध्ये माझ्या झालेल्या सर्वपक्षीय सत्काराने मी भारावून गेलो असल्याने निवडणुका संपल्यानंतर ही असेच सामाजिक प्रश्नांसाठी एकत्र या,नेवासा शहरामध्ये सामाजिक शांती नांदली तर हे माऊलीचे क्षेत्र खऱ्या अर्थाने उत्कर्षाकडे जाईल.
प्रारंभी भाजपचे डॉ.लक्ष्मणराव खंडाळे , अनिल ताके , शिवसहकार सेनेचे राज्य उपप्रमुख बालेंद्र पोतदार , माजी प्राचार्य डॉ.अशोक शिंदे , डॉ. शंकर शिंदे ,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सतीश मुळे , माजी आदर्श शिक्षक प्रा.वाय.बी.शेख सर यांनी जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या कार्याचे कौतुक केले.यावेळी जेष्ठ नेते विश्वासराव गडाख,मुळा एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष प्रशांत गडाख,पंचायत समितीच्या सभापती सुनीता गडाख ,तुकाराम नवले ,कडुबाळ कर्डीले ,मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर , भाऊसाहेब मोटे ,डॉ.गीताराम कुलकर्णी, जयप्रकाश रासने ,अँड.देसाई देशमुख ,गंगा पाटील कानडे ,रम्हू शेठ पठाण राजेंद्र घोरपडे महम्मद आत्तार धर्मा भिंगारदे डॉ.करण घुले, अशोक गुगळे एम.आय.पठाण ,पोपट जिरे तुकाराम शेंडे , पंचायत समिती सदस्य रावसाहेब कांगुणे ,विक्रम चौधरी ,मच्छिंद्र हापसे ,रामभाऊ खंडाळे ,रमेश ओस्तवाल ,मोहन चोरडिया ,बाळासाहेब भणगे यांच्यासह सर्वपक्षिय पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते .