Breaking News

पोलीस चकमकीत नक्षली ठार.


रायपूर : छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलासोबत उडालेल्या चकमकीत शनिवारी सायंकाळी एक जहाल नक्षली ठार झाला. करीगुंडम व इटापारा गावानजीकच्या जंगलात जिल्हा राखीव दलाच्या (डीआरजी) एका तुकडीवर नक्षल्यांनी अचानक हल्ला केल्यानंतर चकमक उडाली. यावेळी सुरक्षा दलाच्या गोळीबारात १ नक्षली ठार झाल्यानंतर इतर नक्षल्यांनी पलायन केले. यावेळी घटनास्थळावरून नक्षल्याच्या मृतदेहासह १ बंदूक, एक ३१५ बोरची रायफल जप्त करण्यात आली. मात्र, ठार झालेल्या नक्षल्याची अद्यापपर्यंत ओळख पटली नसल्याचे यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक जितेंद्र शुक्ला यांनी सांगितले.