तुरीचा ट्रक पळवणारे सांगलीतील पाच अटकेत
सोलापूर, - जत तालुक्यातील संख गावाहून 265 पोती तूर घेऊन सोलापूरकडे येताना 12 डिसेंबर रोजी चोरांनी बेगमपूरजवळ चालकाला मारहाण करून ट्रक पळविला होता. नंदकुमार शिंदे (रा. मळनगाव, ता. कवठेमहांकाळ) यांनी कामती पोलिसात तक्रार दिली होती. यात पाच जणांना अटक झाली आहे.
अशोक बबन निळे (व्हसपेठ ता. जत, जि. सांगली), पैगंबर सिकंदर शेख (वय 27, रा. तासगाव फाटा ता. मिरज), संभाजी वसंत ननवरे (24), दत्ता रायगोंडा बंडगर (25, दोघे रा.माडग्याळ ता.जत) दादासाहेब पडोळकर (रा.कुलाळवाडी, ता.जत) यांना अटक आहे. बेगमपूर-घोडेश्वर शिवारात ट्रक एमएच 10 झेड 2304 आल्यावर बोलेरो जीपमधून आलेल्या चौघांनी 265 पोती तुरसह ट्रक, हजार रुपये मोबाइल पळविले होते.
तपासात हा गुन्हा व्हसपेठ ता. जत येथील अशोक निळे त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती समोर आली होती. ते सगळेजण रात्री उमदी- हुलजंती मार्गे मंगळवेढ्याकडे येणार असल्याची माहिती मिळाली होती. हुलजंती फाटा येथे सापळा रचून ताब्यात घेतल्यानंतर चौक शीत गुन्ह्याची कबुली दिली. ट्रकसह 213 तुरीची पोती, बोलरो जीप जप्त केली आहे.