Breaking News

मुंबई महापालिका आयुक्तांची नार्को चाचणी करा; मनसेची मागणी

मुंबई, - कमला मिल दुर्घटनेनंतर काही राजकीय नेत्यांकडून दबाब आल्याचा खळबळजनक आरोप करणारे मुंबई महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांची नार्को चाचणी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही मागणी केली आहे.


मुंबईच्या नागरिकांनी सत्ताधार्‍यांना पारदर्शी कारभारासाठी निवडून दिले आहे. त्यामुळे लोकांना खरे काय ते सांगण्याची मेहता यांची जबाबदारी आहे. मेहता यांच्यावर दबाव आणणारा नेता महापालिकेतील सत्ताधारी पक्षाचा आहे की विरोधी पक्षातला आहे हे कळायलाच हवे. जर, आयुक्त त्या नेत्याचे नाव सांगणार नसतील तर त्यांची नार्को टेस्ट क रण्यात यावी, असे देशपांडे यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.
एका राजकीय नेत्याने कमला मिल दुर्घटनेची कारवाई थांबवण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला, असा गौप्यस्फोट मेहता यांनी पालिका सभागृहात केला. यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून अजॉय मेहता यांनी त्याचे नावे जाहीर करावे, अशी मागणी सर्वच पक्षांनी करण्यात येत आहे.