Breaking News

दोन अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एट्रोसिटीचा गुन्हा दाखल


कर्जत/प्रतिनिधी/-तालुक्यातील रूईगव्हाण येथील दोन अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये पोस्को कायद्यासह एट्रोसिटी गुन्हा दाखल केला आहे.कर्जत तालुक्यातील पीरफाटा रूईग्व्हाण येथे फीर्यादी आपल्या मैत्रिणीसह शाळा सुटल्यानंतर एसटीने उतरल्या. आपल्या घरी जात असताना रूईगव्हाण येथील शुभम जमादार याने या दोघीच्या जवळ जात फीर्यादीचा उजवा हात पकडून तू मला खूप आवडते असे म्हणत, या मुलीला लज्जा उत्पन्न होईल असे क्रूत्य करून विनयभंग केला. 

यावेळी तिच्या मैत्रिणीने मध्ये पडून त्याला अटकाव करत जाब विचारन्याचा प्रयत्न केला असता शुभम याने तिचाही हात पकडून तिचाही विनयभंग केला. जातिवाचक शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. यावरून कर्जत पोलीस स्टेशनला काल उशीरा पोस्को कायद्यासह अक्ट्रोसिटी कायद्याण्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणांचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे हे करत आहेत