अपघातवार - राज्यात वेगवेगळ्या घटनेत 17 ठार
मुंबई : राज्यात शनिवारी 3 वेगवेगळया दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला. सांगलीतील भीषण अपघातात पाच पैलवानांसाह गाडी चालकांचा मृत्यू झाला तर इतर पाच जणांची पकृती गंभीर आहे. तर दुसर्या एका घटनेत ओएनजीसीच्या पाच उपमहाव्यवस्थापकांना तेलाच्या खाणीवर वाहून नेणारे हेलिकॉप्टर डहाणू किनारपट्टीपासून 40 किलोमीटर आत समुद्रात कोसळलं. या हेलिकॉप्टरमधील 2 पायलटसह पाचही प्रवासी मृत्यूमुखी पडल्याची शक्यता आहे. तर तिसर्या घटनेत डहाणूमध्ये 40 विद्यार्थ्यांना घेऊन समुद्रात गेलेली बोट उलटून 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
सांगलीतील कडेगाव तालुक्यातील वांगीमध्ये झालेल्या भीषण अपघातात पाच पैलवानांसह गाडी चालकाचा मृत्यू झाला आहे, तर पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. सातार्यातून कुस्ती खेळून परतताना हा अपघात घडला. शुक्रवारी रात्री एकच्या सुमारास सांगलीतील कुंडल गावातल्या क्रांती कुस्ती संकुलाचे काही पैलवान प्रवास करत होते. सातार्यातील औंधमध्ये कुस्ती खेळून ते क्रूझरने परतत होते. शिरगाव फाट्याजवळ उसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि क्रूझर यांची धडक होऊन भीषण अपघात झाला.
त्यानंतर चिंचणी वांगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने सर्व जखमींना मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. पैलवान आकाश देसाई, पैलवान विजय पाटील, पैलवान सौरभ माने, पैलवान शुभम घारगे यांचा मृत्यू झाला.
मुंबईजवळ शनिवारी सकाळी बेपत्ता झालेले ओएनजीसीचे हेलिकॉप्टर डहाणूजवऴ कोसळले. या हेेलिकॉप्टरचे अवशेष डहाणुच्या समुद्रात सापडले असून ओएनजीसीचे सात कर्मचारी बेपत्ता झाले आहेत. या कर्मचार्यांचा शोध सुरु आहे. जुहू विमानतळावरून आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास हेलिकॉप्टरने टेकऑफ केले होते. त्यानंतर मुंबईपासून 30 नॉटिकल मैलावर गेल्यानंतर त्याचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला. पवनहंस चॉपर 2 पायलट्स व 5 प्रवाशांना घेऊन निघाले होते. ठरलेल्या वेळेत हे हेलिकॉप्टर ओएनजीसीच्या समुद्रातील तेल केंद्राजवळ पोहचले नाही. हेलिकॉप्टर ठराविक वेळेच पोहचलेे नसल्याने ओएनजीसीने इंडियन कोस्ट गार्डला याबद्दलची माहिती दिल्याचे सांगण्यात आले.

डहाणूमध्ये 40 विद्यार्थ्यांना घेऊन समुद्रात गेलेली बोट उलटून 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. यातील 32 विद्यार्थ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. बाहेर काढण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना डहाणू कॉटेज रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्व विद्यार्थी पालघर जिल्ह्यातील के. एल. पोंडा या हायस्कूलमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. हे सर्व विद्यार्थी अकरावी आणि बारावीतले असून यामध्ये मुलींचाही समावेश आहे. विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी ही बोट समुद्रात 2 नॉटिकल अंतरावरच उलटली आणि बुडाली. बोट उलटल्याची माहिती मिळताच तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. घटनास्थळी अँब्युलन्सही आणण्यात आल्या आहेत. ही बोट नेमकी का उलटली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.