Breaking News

मकर संक्रांति :- तीळ गूळ घ्या आणि गोड गोड बोला...

तीळ गूळ घ्या आणि गोड गोड बोला... हे शब्द आपल्याला संक्रातीची आठवण करून देतात, कारण 
मकर संक्रांतीला तीळ आणि गूळ यांचे लाडू तयार करून ते वाटण्याची परंपरा आहे. पुर्वी झालेल्या कटू आठवणींना विसरून त्यावर तीळासोबत गूळाचा गोडवा भरा असे बोलले जाते.



भारत कृषिप्रदान देश आहे, प्रत्येक सण हे शेती व्यवसायाशी संबंधित असतो, आपल्याकडे जे सण, उत्सव साजरे केले जातात, ते काही सर्वत्र साजरे केले जातात, परंतु काही वेगवेगळ्या नावाने साजरे केले जातात,
त्या सर्वांचे असे वेगळे स्थान, वेगळे महत्व आहे. काही सणांना धार्मिक महत्व आहे, तर काही सणांना शास्त्रीय दृष्टीकोनातुन महत्वाचे स्थान आहे. परंतु नविन वर्ष सुरू झाल्यानंतर पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांती. हा नविन वर्षातील पहिला सण आपणास सर्व रूसवे फुगवे दूर करण्याची संधी देखील देतो, परंतु हिंदू संस्कृतीमधील हा एकमेव सण दरवर्षी एकाच दिवशी येतो तो म्हणजे 14 जानेवारीला क्वचितच तो 15 जानेवारीला येतो, परंतु ते कदाचितच. याचे कारण हा एकमेव सण सूर्याच्या स्थानावर आधारलेला आहे. 

बाकी सर्व सण हे चंद्राच्या स्थानावर आधारलेले असतात. सोलर सायकल ही दर 8 वर्षांनी एकदा बदलते, त्या वेळी मात्र हा सण 15 तारखेला साजरा केला जातो. मागील दोन वर्षापुर्वी म्हणजेच 2016 ला मकर संक्रांती ही 15 तारखेला साजरी करण्यात आली होती. मकर संक्रांती सण दर 50 वर्षानंतर एक तारीख पुढे जाते. याचे उदाहरणच द्यावयाचे म्हटले तर, स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी रोजी झाला होता, त्या वेळी मकर संक्रांतीचा दिवस होता, याप्रमाणे जर पाहिले तर, 2050 साली हा सण 15 जानेवारीला साजरा होईल. असेही अंदाज लावले जात आहेत.
महाराष्ट्रामध्ये हा सण तीन दिवस साजरा केला जातो. या 3 दिवसांमध्ये संक्रांतीच्या अगोदरच्या दिवशी भोगी, भोगीच्या दुसर्‍या दिवशी संक्रांति आणि संक्रांतिचा दुसरा दिवस म्हणजे किंक्रांत अशी नावे देण्यात आली आहेत. संक्रांतीस सर्व जवळच्या लोकांना आणि मित्रमंडळींना तिळगुळ आणि स्त्रियांना वाण वाटून तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे सांगून प्रेम आणि चांगली भावना वाढीस लागण्यास शुभकामना दिली जाते. विवाहित स्त्रिया 
या दिवशी एकमेकींना हळदी-कुंकू लावण्याची एक परंपरा आहे.
* मकरसंक्रांती या सणाबद्दल दंतकथाही सांगितल्या जातात, त्यापैकी एक म्हणजे
अनादी वर्षांपुर्वी संकरासुर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार त्रास देत असे, मग त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. या संक्रांती देवीने संकरासुराचा वध केला आणि लोकांची त्याच्यापासून सुटका केली. याला आणखी एक अख्यायिका आहे. ती म्हणजे, महाभारतामध्ये कुरु वंशाचे संरक्षक महाराज भीष्म बाणांच्या शय्येवर उत्तरायणाची वाट पहात पडून होते. त्यांना इच्छामरणाचे वरदान प्राप्त होते. त्यांनी या शुभ दिवशी म्हणजेच उत्तरायण सुरू होताच प्राणत्याग केल्याची गाथा आहे. हिंदू परंपरेमध्ये उत्तरायणाचा कालावधी दक्षिणायन कालावधी पेक्षा जास्त शुभ मानला जातो.
* बारा राशींमधील एक मकर रास आहे, सूर्य एका राशिमधून दुसर्‍या राशीमध्ये प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला संक्रमण त्यालाच संक्रांती असे म्हटले जाते. त्याचबरोबर मकर संक्रांती दिवशीच सूर्य धनु राशीतुन मकर राशीमध्ये प्रवेश करतो. त्यामुळे या सणाला मकर संक्रांती असे म्हटले जाते. या दिवसा अगोदर रात्र मोठी असते दिवस लहान असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र आणि दिवस समान असतात. या नंतर रात्री लहान तर दिवस मोठा होत जातो. या दिवसापासून थंडीच्या प्रमाणामध्ये कमतरता होत जाते आणि धीम्या गतीने उष्णता वाढत जाते.

मकरसंक्रांतीच्या निमित्ताने अनेक यात्रा आयोजित केल्या जातात, यात सर्वात प्रमुख म्हणजे प्रसिद्ध कुंभमेळा. हा कुंभमेळा दर बारा वर्षांनी नाशिक, हरिद्वार, प्रयाग, उज्जैन अशा चार जागी चक्राकार पद्धतीने आयोजित केला जातो. याशिवाय कोलकाता शहरा जवळ गंगा नदी जेथे बंगालच्या उपसागरास मिळते त्या गंगासागर नावाच्या ठिकाणी गासागर यात्रा आयोजित करण्यात येत असते. संक्रांतीच्या दिवशी केले जाणारे तीर्थ स्नान आणि दान पुष्यदायी मानले आहे. या दिवशी प्रयाग, गंगासागर इत्यादी ठिकाणी भक्तांचे प्रचंड मेळे भरतात. मकरसंक्रांतीस अनेक यात्रांचे आयोजन देखील केले जाते. यामध्ये सर्वात प्रमुख म्हणजे प्रख्यात कुंभमेळा जो दर बारा वर्षांनी हरिद्वार, प्रयाग, उज्जैन आणि नाशिक अशा चार जागी चक्राकार पद्धतीने आयोजित होतो. 

याबरोबरच गंगासागर येथे, कोलकाता शहराजवळ गंगा नदी, ज्याठिकाणी बंगालच्या उपसागरास मिळते, तेथे गंगासागर यात्रा आयोजित केली जाते. केरळच्या शबरीमला येथे मकरज्योतीचे दर्शन घेण्यास या दिवशी अनेक भाविकांची गर्दी होते. संक्रांति केवळ भारतातच साजरी केली जात नाही, तर ही आशिया खंडातील इतर देशांमध्ये देखील साजरी केली जाते. याला नेपाळ मध्ये माघी किंवा माघी संक्राती, थायलंड मध्ये सोंग्क्रान, लाओस मध्ये पी मा लाओ आणि म्यानमार मध्ये थिंगयान असे म्हंटले जाते. भारतात देखील याला लोहरी, मकर संक्रांती, पोंगल इत्यादी नावे आहेत. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या नावाने जरी ओळखला जात असला तरी त्यामागचे हेतू एकच आहे.
संक्रांति केवळ भारतातच साजरी केली जात नाही, तर आशिया खंडातील इतर देशांमध्ये देखील साजरी केली जाते. याला नेपाळ मध्ये माघी किंवा माघी संक्राती, थायलंड मध्ये सोंग्क्रान, लाओस मध्ये पी मा लाओ आणि म्यानमार मध्ये थिंगयान असे म्हंटले जाते. भारतात देखील याला लोहरी, मकर संक्रांती, पोंगल इत्यादी नावे आहेत. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या नावाने जरी ओळखला जात असला तरी त्यामागचे हेतू एकच आहे.

मकर संक्रांती सणाची नववधू आवर्जून वाट पाहत असतात. एका वर्षामध्ये बारा राशींमधून सूर्याची चार वेळा संक्रमणे होत असतात, तरिदेखील भारतीयांच्या दृष्टीने मकर संक्रमणाला अर्थातच मकर संक्रांतीला अनन्य साधारण महत्त्व आहे. या संक्रमणामुळे उत्तर गोलार्धामध्ये राहणार्‍या भारतीयांना मकर संक्राती निमित्ताने सूर्याच्या उत्तरायणामधील संक्रमणामुळे अधिक प्रकाश व उष्णता मिळण्यास सुरूवात होते. महाराष्ट्रामध्ये संक्रांतीच्या अगोदरच्या दिवशी भोगी आणि दुसर्‍या दिवशी किंक्रांत साजरी केली जाते. या सणाच्या निमित्ताने स्त्रिया गरिबांना मातीच्या घटाचे दान देतात, देवाला तांदूळ, तीळ अर्पण करून सौभाग्याचे वाण लुटत असतात. 

थंडीच्या काळामध्ये तिळाचे फार महत्व समजले जाते. थंडीमुळे शरीरामध्ये उष्णतेची गरज निर्माण होते, शरीराची ही गरज भागविण्यासाठी तीळाची अत्यंत मदत होते. त्याचबरोबर खरीप हंगामामध्ये शेतामध्ये पिकलेली बाजरी उष्ण असते, त्यामुळे या सणाच्या निमित्ताने बाजरीची भाकरी करून त्या भाकरीला तीळ चिकटवले जातात, लोणी, सोताणे, गाजर, मुगाच्या डाळीची खिचडी, ओला हरबरा, वांगी, वावटे, याच हंगामात मिळणारे बोर, बिब्व्याची फुले या सर्वांची मिळून या एक भाजी तयार केली जाते, ती म्हणजे खेंगट नावाची भाजी तयार केली जाते, वरिल सर्व पदार्थ एकाच भाजीमध्ये वापर केला असल्यामुळे ही भाजी आणि तीळ बाजरीची भाकरी शरिरासाठी शक्तिवर्धक ठरून शरिरामध्ये उष्णता, उर्जा निर्माण करते.