Breaking News

आमदार स्नेहलता कोल्हे यांनाही आवरला नाही सेल्फी घेण्यांचा मोह !


कोेपरगांव:-स्वच्छ सुंदर माझे षहर कोपरगांव या क्षणाचा मोह आमदार स्नेहलता कोल्हे यांनीही सेल्फीद्वारे स्वतः अनुभवला आणि षासन कोपरगांव नगरपालिका विविध सामाजिक संघटना विविध राजकीय पक्षांने स्वच्छतेबाबत घेतलेली प्रत्येक बाबीची त्या त्या ठिकाणी जाउन मंगळवारी पाहणी केली. 
नगरपालिकेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे उपनगराध्यक्ष विजय वाजे आणि मुख्याधिकारी षिल्पा दरेकर आरोग्य समितीचे सभापती कालुआप्पा आव्हाड व सर्व नगरसेवक तसेच सर्व समित्यांचे सभापती नगरपालिका प्रषासकीय कर्मचारी अधिकारी यांच्यावतींने सध्या षहरात स्वच्छता सव्र्हेक्षण सुरू आहे. षहर प्रभाग स्वच्छतेसाठी जनजागृती अॅपद्वारेही सुरू आहे. यात केल्या जाणां-या कामांचा स्वतः आमदार स्नेहलता कोल्हे यांनी एका बैठकीत आढावा घेवुन स्वच्छतेची पाहणी केली. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष संजय सातभाई अमृत संजीवनीचे उपाध्यक्ष पराग संधान उपनगराध्यक्ष विजय वाजे बाळासाहेब आढाव भाजपा तालुकाध्यक्ष षरद थोरात षहराध्यक्ष कैलास खैरे यांच्यासह विविध पदाधिकारी कार्यकर्ते सर्व नगरसेवक उपस्थित होते.

आमदार स्नेहलता कोल्हे यांनी षहरात ठिकठिकाणी लावलेले सप्तपदी स्वच्छतेची हगणदारीमुक्त षहर स्वच्छ षहर कचरा लाख मोलाचा या आषयाचे फलक पाहुन षहराचे वैभव स्वच्छता समृध्दीतुन वाढविण्यांसाठी नागरिकांनी नगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन केले. कचरा हा रोगराईला आमंत्रण देतो तेंव्हा परिसर स्वच्छतेला सर्वांनी महत्व द्यावे याकामी काही विधायक सुचना असतील तर त्याही कराव्या व कोपरगांव षहराला केंद्र व राज्याच्या स्वच्छता सव्र्हेक्षणांत अव्वलस्थानी आणण्यांचा प्रयत्न करावा. कचरा टाकुन उकीरडा बनविण्यांपेक्षा त्याजागी बाग फुलवून बालकासह सर्वांचेच लक्ष वेधुन घेण्यांचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे. धारणगांव रोड परिसरात फुललेल्या बागेवर जाउन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी सेल्फी घेत तो क्षण स्वतःच्या फेसबुकवर टाकत सोषल मिडीयाच्या माध्यमंातुन जनजागृतीचे आवाहन केले. आमदार कोल्हे यांनी नगरपालिकेसह सामाजिक संघटनांचे कौतुक केले.